पोटच्या गोळ्याला मंदिरात ठेवून मातेचे पलायन

By Admin | Updated: May 14, 2014 21:18 IST2014-05-14T20:20:47+5:302014-05-14T21:18:33+5:30

मुंडगावपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या झाडोबा मंदिरात एक महिन्याचे बालक कापडात गुंडाळून बेवारस स्थितीत आढळून आले.

Maternity leave by putting stomach pills in the temple | पोटच्या गोळ्याला मंदिरात ठेवून मातेचे पलायन

पोटच्या गोळ्याला मंदिरात ठेवून मातेचे पलायन

मुंडगाव(आकोट) : मुंडगाव-वणी वारूळा रस्त्यावर मुंडगावपासून २ कि. मी. अंतरावर असलेल्या झाडोपा मंदिरात अज्ञात निर्दयी मातेने नवजात मुलाला ठेवून पळ काढल्याची घटना १४ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. मुंडगावपासून २ कि. मी. अंतरावर असलेल्या झाडोबा मंदिरात एक महिन्याचे बालक कापडात गुंडाळून बेवारस स्थितीत आढळून आले. त्यानंतर राहुल भेले यांनी आकोट पोलीस स्टेशनला माहिती दिली व तेथून जात असलेल्या रुग्णवाहिकेला थांबवून या बालकाला ग्रामीण रुग्णालय आकोट येथे भरती केले. डॉक्टरांनी बालकाची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारार्थ अकोला ग्रामीण रुग्णालयात पाठविले. राहुल भेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३१७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब नाईक व  पो. उपनिरीक्षक शशिकांत गायकवाड करीत आहेत.

 

 

Web Title: Maternity leave by putting stomach pills in the temple