शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

मीरा रोड कॉल सेंटरचा मास्टरमाईंड शॅगी फक्त 23 वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 13:28 IST

शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 10 - मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर घोटाळयातील मुख्य सूत्रधाराचे वय अवघे 23 वर्ष असल्याची नवी माहिती समोर आली आहे. शागर ठक्कर उर्फ शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 
 
मीरा रोडच्या हरी ओम आयटी टॉवर इमारतीतून चालवल्या जाणा-या बोगस कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरीकांना फोन केले जायचे. विमा पॉलिसी विक्री तसेच कर गोळा करण्याची धमकी देऊन अमेरिकन नागरीकांकडून पैसे उकळले जायचे. ठाणे पोलिसांच्या 200 जणांच्या पथकाने मागच्या मंगळवारी कारवाई करुन सात कॉल सेंटर्सना सील ठोकले. 
 
आणखी वाचा 
 
शागरची ऐशोआरामी लाईफस्टाईल होती. त्याच्याकडे अनेक महागडया गाडया आहेत. पैशांची तो उधळण करायचा. आमचे सिनिअर्स जास्तीत जास्त बिझनेस आणण्यासाठी त्याचे उदहारण द्यायचे असे या कॉलसेंटर्समध्ये काम करणा-या कर्मचा-यांनी पोलिस चौकशीत सांगितले. अनेक अमेरिकन तपास यंत्रणा ठाणे पोलिसांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे हा घोटाळा उघड झाला. कॉल सेंटरमधूनच नव्हे तर, घरातूनही अमेरिकन नागरीकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरु असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
 
अनेक कॉल सेंटरवरून कर गोळा करण्याची धमकी देत रकमेची वसुलीही केली जायची. या कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओवर इंटरनेट पोर्टल)वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटर्नल रेव्हेन्यू ऑफिसर असल्याची बतावणी करीत अनेकांना कर चुकविल्याचे सांगत खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची. 
दंडापोटी १० हजार डॉलर्सची मागणी करून नंतर कमी रकमेवर तडजोड करून रक्कम टार्गेट गिफ्ट कार्डद्वारे वसूल करण्याचा सपाटा या सेंटरमधून सुरू होता. या प्रकरणी 70 कर्मचा-यांना अटक केली असून, 630 जणांना नोटीस पाठवली आहे.