'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 01:45 PM2020-02-09T13:45:26+5:302020-02-09T13:45:52+5:30

शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

The martyrs wife will get the land | 'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार

'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार

Next

बीड : 'सरकारी काम आणि वर्षभर थांब' या उक्तीप्रमाणे प्रशासकीय दफ्तर दिरंगाईच्या बळी ठरलेल्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जवान तुकाराम राख यांना १ मे २०१० रोजी 'ऑपरेशन रक्षक'मध्ये वीरमरण आले होते. त्यांनतर त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्यावर समोर उदरनिर्वाह, लहान मुलीचे शिक्षणाच्या समस्या उभ्या राहिल्या आहे.

तर २०१८ मधील शासन निर्णयाप्रमाणे शहिदांच्या वारसांना २ हेक्टर जमीन देणे अभिप्रेत आहे. मात्र गेले अनेक दिवस शासकीय कार्यलयांच्या चकरा मारून व कागदपत्रांची पूर्तता करूनही आपल्याला जमीन मिळाली नाही, आपल्यावरील अन्याय दूर करावा असे निवेदन भाग्यश्री यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले होते. तसेच आठवड्याभरातच आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी दिला होता.

मुंडे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून भाग्यश्री राख यांना तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे वीरपत्नी भाग्यश्री राख यांना २ हेक्टर जमीन जमीन मिळणार आहे.

Web Title: The martyrs wife will get the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.