अमेरिकेहून येताच मार्टिनला अटक

By Admin | Updated: April 26, 2017 01:54 IST2017-04-26T01:54:15+5:302017-04-26T01:54:15+5:30

सहा महिन्यांपूर्वी चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मार्टिन लोपिसला (६८) वालीव पोलिसांनी अखेर गजाआड केले.

Martin was arrested from the United States | अमेरिकेहून येताच मार्टिनला अटक

अमेरिकेहून येताच मार्टिनला अटक

विरार : सहा महिन्यांपूर्वी चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मार्टिन लोपिसला (६८) वालीव पोलिसांनी अखेर गजाआड केले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे तो अमेरिकेला पळून गेला होता. आज अमेरिकेहून परतताच त्याला वालीव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोखिवरे येथे राहणाऱ्या मार्टिनने चाकूच्या धाकाने मोलकरणीच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला होता. मुलीच्या तक्रारीनंतर त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Martin was arrested from the United States