शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा
By Admin | Updated: November 26, 2014 01:34 IST2014-11-26T01:34:23+5:302014-11-26T01:34:23+5:30
देशातील शेतक:यांची परिस्थती बदलायची असेल तर शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा, असे मत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी व्यक्त केले.

शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा
शरद जोशी यांचे प्रतिपादन : यशवंतराव चव्हाण पुरस्काराचे वितरण
मुंबई : देशातील शेतक:यांची परिस्थती बदलायची असेल तर शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा, असे मत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण पुरस्काराने शरद जोशींना मंगळवारी सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देवून सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर, खा. सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, शेतीच्या क्षेत्रतील शरद जोशींचे योगदान मोठे आहे. देशाचा कृषिमंत्री म्हणून पंजाबसारख्या राज्यात कार्यक्रमात जावे लागायचे. तिथे अनेकदा माझा परिचय शरद जोशी असा केला जायचा. ही त्यांच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे! रासायनिक बियाणो, संशोधित वाणाबाबत घेतलेल्या निर्णयावर संसदेत व माध्यमात मोठी टिका झाली. मात्र, अशावेळी शेतक:यांचे हित लक्षात घेत शरद जोशींचा पाठिंबा मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेसाठीही जोशींनी मोठे काम केले, असे गौरोद्गारही पवार यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना जोशी म्हणाले, तुमची राजकीय समीकरणो असू शकतात. पण शेतक:यांच्या प्रश्नावर आपण एकत्र आले पाहिजे. देशातील शेतकरी आज नागवला जात आहे. सगळेजण शेतीच्या मुळावर उठले आहेत. शेतक:यांच्या प्रश्नावर 3क् नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार आहे. त्याला राष्ट्रवादीने साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)
यशवंतरावांना आदरांजली
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अतिरिक्त सचिव उत्तमसिंग चव्हाण, विशेष कार्य अधिकारी श्रीनिवास जाधव आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.