पतीसमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार, वर्ध्यातील संतापजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:30 IST2020-06-28T20:21:14+5:302020-06-28T20:30:31+5:30
आरोपी फरार झाल्यानंतर, पीडितेच्या पतीने देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, हे प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सावंगी पोलिसांनी तत्काळ संबंधित फार्महाऊसवर पोहोचत पंचनामा केला.

पतीसमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार, वर्ध्यातील संतापजनक घटना
वर्धा - नोकरीचे आमिष दाखवत एका विवाहितेवर पती समोरच सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि सर्व सहाही आरोपींना अटक केली आहे. येथील एका फार्महऊसवर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला नोकरीचे आमिष दाखवून मुलखतीच्या बहाण्याने सिंदी (रेल्वे) येथून सावंगी (मेघे) येथे बोलावण्यात आले होते. यानंतर तिला आणि तिच्या पतीला येथून सेलुसरा येथे एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे आधीपासूनच सहा जण टपून बसले होते. तेथे गेल्यानंतर तिच्या पतीला बाहेरच थांबवण्यात आले आणि तिला आत बोलावण्यात आले. घडत असलेल्या प्रकाराची शंका येताच पतीने विरोध केला. यावर आरोपींनी त्याला धमकावले आणि बाहेरच पकडून ठेवले. यानंतर पीडितेवर एकापाठोपाठ एक करून या सहाही नराधमांनी बलात्कार केला आणि ते घटना स्थळावरून फरार झाले. घटनेनंतर आरोपींनी महिला आणि तिच्या पतीला यासंदर्भात कुठेही बोललात तर ठार करू अशी धमकीही दिली होती.
याप्रकरणी, होमराज बाबाराव भोयर (वय 39, रा. धारपुरे ले-आउट सिंदी (मेघे), लोकेश ऊर्फ अभिजित गजानन इंगोले (वय 24, रा. तुकाराम वॉर्ड), शेखर सुरेश चंदनखेडे (वय 24, रा. पवनार), नितीन मारोतराव चावरे (वय 27, रा. खरांगणा (गोडे)), राहुल बनराज गाडगे (वय 28, रा. खरांगणा (गोडे)) तसेच पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (वय 26, रा. सिंदी (मेघे), यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
तत्पूर्वी, आरोपी फरार झाल्यानंतर, पीडितेच्या पतीने देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, हे प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सावंगी पोलिसांनी तत्काळ संबंधित फार्महाऊसवर पोहोचत पंचनामा केला. यावेळी देवळी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार