लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवले

By Admin | Updated: March 28, 2017 15:07 IST2017-03-28T15:07:41+5:302017-03-28T15:07:41+5:30

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळळ्या घटना सदर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

Married to the girl by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवले

लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवले

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळळ्या घटना सदर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
फिर्यादींची मुलगी २५ मार्चला सदरमधील अंजुमन कॉलेज येथे १२ वी चा पेपर देण्याकरिता गेली होती. शेजारी राहणारा आरोपी संजय उर्फ संजू (वय २२, रा. धारना, जि. शिवनी) याने पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी संजूविरूध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला. आहे.
अशाच प्रकारे एमआयडीसी हद्यीत राहणारी फियार्दी यांची १७ वर्षीय अल्पवयीन साळी हिला सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास शेजारी राहणारा संशयित आरोपी राकेश पितांबर रॉय (वय २२) याने फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या भाऊजींनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी राकेशविरूध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला. या दोन्ही प्रकरणात पोलीस बेपत्ता मुली आणि त्यांना पळवून नेणारांचा शोध घेत आहेत.

Web Title: Married to the girl by showing lover of marriage