लग्नानंतर दुस:याच दिवशी सोडल्याने विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: October 2, 2014 23:27 IST2014-10-02T23:27:07+5:302014-10-02T23:27:07+5:30

दुस:याच दिवशी पतीने सोडून दिल्याने हवालदिल झालेल्या 17 वर्षाच्या विवाहितेने भावाच्या घरी जाऊन स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भांबोली (ता. खेड, जि. पुणो) येथे घडला.

Marriage suicides after leaving after the second day after marriage | लग्नानंतर दुस:याच दिवशी सोडल्याने विवाहितेची आत्महत्या

लग्नानंतर दुस:याच दिवशी सोडल्याने विवाहितेची आत्महत्या

>चाकण : आळंदीत जाऊन लग्न केल्यानंतर दुस:याच दिवशी पतीने सोडून दिल्याने हवालदिल झालेल्या  17 वर्षाच्या विवाहितेने भावाच्या घरी जाऊन स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भांबोली (ता. खेड, जि. पुणो) येथे घडला. 
पोलिसांनी या प्रकरणी संतोष अशोक वाघ (वय 25, रा. पिंपरी) याला अटक केली आहे. बिंदू जग्गू वाघोरे (वय 17) असे या घटनेत पेटवून घेऊन आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. मागील पंधरवडय़ात (दि. 2क् सप्टेंबर) संतोष आणि बिंदू यांनी पळून जाऊन आळंदी (ता. खेड) येथे प्रेमविवाह केला. मात्न, संतोषच्या घरच्यांनी कडाडून विरोध केल्याने त्याने दुस:याच दिवशी बिंदूला पुन्हा तिच्या आई-वडिलांकडे सोडले. हवालदिल झालेल्या बिंदूने भांबोली (ता. खेड, जि. पुणो) येथे आपल्या भावाच्या घरी धाव घेतली. वैफल्यग्रस्त होऊन  स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर चाकण पोलिसांनी संतोष अशोक वाघ याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Marriage suicides after leaving after the second day after marriage