चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार

By Admin | Updated: January 20, 2017 02:02 IST2017-01-20T02:02:11+5:302017-01-20T02:02:11+5:30

चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रकार कुरार परिसरात घडला.

Marriage rape by knife | चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार

चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार


मुंबई : चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रकार कुरार परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. सलीम खलिफा (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो मूळचा गुजरातच्या कच्छ परिसरातील रहिवासी आहे. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पीडित तरुणी ही मालाड पश्चिम परिसरात तिच्या पतीसोबत राहते. लग्नापूर्वी ही तरुणीदेखील कच्छमध्ये राहत होती. तेव्हा या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र नंतर तिचे लग्न झाले आणि ती मुंबईला आली. थर्टीफर्स्टच्या रात्री ती तिच्या मालाड पूर्वच्या त्रिवेणीनगर परिसरात राहणाऱ्या मावशीच्या घरी आली होती. काही कामास्तव तिची मावशी घराबाहेर गेली होती.
तेव्हा कच्छमधून तिचा पाठलाग करत मुंबईला आलेला खलिफा हा पीडितेच्या मावशीच्या घरात बळजबरीने घुसला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत बलात्कार करून तो पसार झाला. मावशी घरी आल्यावर तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. तेव्हा बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल केली नाही.
मात्र नंतर तिच्या घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन मंगळवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली. खलिफा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage rape by knife