रेल्वेतून पडून बाजार समिती संचालकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 8, 2017 20:35 IST2017-04-08T20:35:01+5:302017-04-08T20:35:01+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रावसाहेब रतन चव्हाण (वय २५) यांचा चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगत गणेश कॉलनी जवळ रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला.

Market Committee Director's death due to fall in train | रेल्वेतून पडून बाजार समिती संचालकाचा मृत्यू

रेल्वेतून पडून बाजार समिती संचालकाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव,दि.8 - कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रावसाहेब रतन चव्हाण (वय २५) यांचा चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगत गणेश कॉलनी जवळ रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना ८ रोजी रात्री १२ ते १ वाजेदरम्यान अप रेल्वे रुळावर खंबा नं.३२६/२१-२२ जवळ घडली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन मास्तर यांनी खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेने रामवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मयत रावसाहेब हे कृउबाचे माजी सभापती रमेश चव्हाण व उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांचे पुतणे होत. ते प्रथमच संचालक म्हणून अपक्ष निवडून आले होते. त्यांच्या पश्चात असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Market Committee Director's death due to fall in train