शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मार्डचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; बैठक न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 6:02 AM

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र राज शासन तयार नसल्याची प्रतिक्रिया मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर, अंबेजाेगाई, यवतमाळ, नांदेड या सरकारी रुग्णालयात निवासी डाॅक्टरांनी रक्तदान शिबिरांचे आयाेजन केले हाेतेया संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांत निवासी डाॅक्टरांनी साफसफाई अभियानाचे आयाेजन करण्यात आले होते

मुंबई : मार्डच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकार मार्डच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करीत दुसऱ्या दिवशीही संप सुरू ठेवला. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे ते मार्डच्या मागण्या पूर्ण करण्यास असफल ठरल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संपाच्या दुसऱ्या दिवशी ‘मार्ड’ संघटनेकडून देण्यात आला आहे.

कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शनिवारी संपाचा दुसरा दिवस असून, निवासी डाॅक्टरांच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप वेळ दिला नसल्याचे मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांची बाह्य रुग्ण कक्षात (ओपीडी) नियुक्ती केली. मात्र, २ ऑक्टाेबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका रुग्णालयात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, सायंकाळी उशिरा इंटर्न डॉक्टरांच्या अस्मी संघटनेने तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने मार्डच्या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला.

संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर दिवशी राज्य अहिंसा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपित्यांना मानवंदना म्हणून आंदोलनादरम्यान राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मार्डतर्फे रक्तदान करून आपला सत्याग्रह असाच पुढे चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. नागपूर, अंबेजाेगाई, यवतमाळ, नांदेड या सरकारी रुग्णालयात निवासी डाॅक्टरांनी रक्तदान शिबिरांचे आयाेजन केले हाेते, तर राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांत निवासी डाॅक्टरांनी साफसफाई अभियानाचे आयाेजन करण्यात आले होते. 

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र राज शासन तयार नसल्याची प्रतिक्रिया मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे पाटील यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनीदेखील अद्याप चर्चेसाठी वेळ दिली नाही, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबराेबरही चर्चा करण्यास तयार आहाेत, असेही त्यांनी म्हटले. या संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. त्यामुळे ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका ओपीडीत शुकशुकाट दिसून  आला.

टॅग्स :doctorडॉक्टर