छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील दारणा प्रकल्पातून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारशीवरून खरातच्या मिरगाव (ता. सिन्नर) येथील शिवनिका संस्थानाला दररोज ३९ लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर ३१ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने शिक्कामोर्तब करून शासन आदेशही जारी केला होता.
बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या खरात याच्या शिवनिका संस्थानसाठी पाण्याची मोठी गरज होती. तेथे त्याने बागबगिचा लावला होता. यासाठी त्याने राजकीय वजन वापरून दारणा धरणातून थेट संस्थानपर्यंत तब्बल ४८ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
हा प्रस्ताव स्थानिक पाटबंधारे कार्यालयामार्फत गोदावरी महामंडळाकडे पाठविण्यात आला. महामंडळाच्या तत्कालीन कार्यकारी संचालकांनी ५ जानेवारी २०२० रोजी या प्रस्तावाला मंजुरी देत शासनाकडे पाठवला. त्यानंतर दारणा धरणातील पाणी गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर सिंचन वापरासाठी खरात याच्या संस्थेला देण्यास मंजुरी देण्यात आली.
लगेच मंजुरी आणि शासन निर्णयही जारीमंत्रिमंडळ उपसमितीने ३१ जुलै २०२० रोजी या प्रस्तावाला अंतिम मान्यता देत ३९ लाख लिटर पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील शासन निर्णयही त्याच दिवशी जारी करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅप्टन खरात याने राजकीय प्रभावाचा वापर करून हे पाणी मंजूर करून घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरात याचा सहायक नीरजची कसून चौकशी नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याचा कार्यालयीन सहायक ऑफिसबॉय नीरज जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली. त्यानंतर त्याला सोडले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षण देखील दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. खरात याच्याशी संबंधित सीसीटीव्हीसह इतर माहितीचा स्रोत म्हणून नीरज याच्यावर प्रामुख्याने संशय आहे. त्याच्याकडून कागपत्रांसह आणखी व्हिडीओ मिळाल्याचे समजते.
खरात वायग्रासह ओश्नो जल द्यायचा : दमानियानाशिकच्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेला भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात हा ‘ओश्नो जल’ नावाच्या कथित पेयामध्ये वायग्रा मिसळून ते काही राजकीय नेत्यांना देत होता, असा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी केला. पेयासाठी अनेक राजकीय नेते गाड्या, हेलिकॉप्टर पाठवत होते, असेही दमानिया म्हणाल्या.
Web Summary : Drought-hit Marathwada's water was diverted to Ashok Kharaat's organization in Nashik. The decision, approved by a cabinet subcommittee, allowed 3.9 million liters daily. Kharaat, arrested for rape, allegedly used political influence for a 48km pipeline. He also allegedly mixed Viagra in a drink for politicians.
Web Summary : सूखे से प्रभावित मराठवाड़ा का पानी नासिक में अशोक खरात के संगठन को दिया गया। मंत्रिमंडल उपसमिति द्वारा अनुमोदित निर्णय में प्रतिदिन 3.9 मिलियन लीटर की अनुमति दी गई। बलात्कार के आरोप में गिरफ्तार खरात ने कथित तौर पर 48 किलोमीटर पाइपलाइन के लिए राजनीतिक प्रभाव का इस्तेमाल किया। उन्होंने कथित तौर पर राजनेताओं के लिए एक पेय में वियाग्रा भी मिलाया।