परतीचा पाऊस मराठवाड्याला पावला!
By Admin | Updated: September 8, 2015 01:18 IST2015-09-08T01:18:41+5:302015-09-08T01:18:41+5:30
संपूर्ण हंगामात मराठवाड्यावर रुसलेला पाऊस अखेर परतीच्या वेळी पावला. औरंगाबाद वगळता विभागातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.

परतीचा पाऊस मराठवाड्याला पावला!
औरंगाबाद : संपूर्ण हंगामात मराठवाड्यावर रुसलेला पाऊस अखेर परतीच्या वेळी पावला. औरंगाबाद वगळता विभागातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
बीडमध्येही रिमझिम पावसाला रात्री ८नंतर सुरुवात झाली होती. आष्टी, अंबाजोगाई, सिरसाळा, माजलगाव व तालखेड परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसाची एकूण सरासरी ७.८ मिमी एवढी नोंद झाली आहे. जालना शहरातही रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. नांदेड, कंधार, लोहा, अर्धापूर, बरबडा, उमरी परिसरातील मुगट, पाथरड, निवघा बाजार शिवारातही पाऊस झाला़ भोकर येथे एक तास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली़ हिंगोली तालुक्यातही सोमवारी पाऊस झाला. (प्रतिनिधी)