शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...आता पावसाचे निमित्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:02 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत विघ्नांची मालिका कायम आहे. संमेलन हे नाशकात की दिल्लीत येथून सुरू झालेली वादांची मालिका स्वागत गीतामध्ये सावरकरांचा टाळलेला उल्लेख, उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांना झालेला विरोध, विश्वास पाटील यांच्याविषयी रंगलेली चर्चा या मार्गे महापौरांचा रुसवा, विनायक मेटेंची टीका येथून अखेर पावसावर येऊन ठेपली.

- मिलिंद कुलकर्णी(कार्यकारी संपादक, लोकमत, नाशिकमराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत विघ्नांची मालिका कायम आहे. संमेलन हे नाशकात की दिल्लीत येथून सुरू झालेली वादांची मालिका स्वागत गीतामध्ये सावरकरांचा टाळलेला उल्लेख, उद्घाटक म्हणून जावेद अख्तर यांना झालेला विरोध, विश्वास पाटील यांच्याविषयी रंगलेली चर्चा या मार्गे महापौरांचा रुसवा, विनायक मेटेंची टीका येथून अखेर पावसावर येऊन ठेपली. पूर्वी नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले संमेलन स्थळ स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या ‘भुजबळ नॉलेज सिटी’ या शहरापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या शैक्षणिक संस्थेत हलविण्यात आले. त्याचवेळी साहित्य रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढ्या लांब जाणार कोण, असा रास्त सवाल विचारला गेला. अर्थात सगळ्या आजारांवर रामबाण औषध संयोजकांकडे असल्याच्या थाटात महापालिकेच्या बससेवा, काही खासगी गाड्यांच्या माध्यमातून रसिकांना संमेलनस्थळी नेले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या सेवेची कार्यक्षमता किती हा प्रश्न आहेच. रसिकांची उपस्थिती रोडावली तर संमेलनस्थळ बदलामुळे घडले, असा ठपका येण्याची भीती संयोजकांना होती. मात्र, पाऊस धावून आला. पूर्वसंध्येपर्यंत नाशिकचे वातावरण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणासारखे झाले आहे. संमेलनाच्या तीन दिवसांत नाशिक आणि नजीकच्या येणाऱ्या साहित्य रसिकांची पावसामुळे गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी येण्याचे टाळले तर मात्र रसिकांची संख्या रोडावेल. संमेलनात उत्कृष्ट कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. या कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला तर त्यात सहभागी होणाऱ्या साहित्यिक, कलावंतांचा उत्साह दुणावतो. रसिकांच्या उपस्थितीसाठी फार काही प्रयत्न झालेले आहेत, असे दिसले नाही. नाशिक जिल्ह्यात असलेल्या साहित्य, सांस्कृतिक संस्थांनादेखील यात सहभागी करून घेतले नसल्याने तेदेखील पाठ फिरविल्याशिवाय राहणार नाहीत. एकंदर गर्दी रोडावली तर निमित्त पावसाचे होईल. संयोजक सहीसलामत सुटतील.      

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक