लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मराठा आणि कुणबी या वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा सामाजिक मागास नाहीत असे न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला काय द्यायचे हा पूर्णपणे सरकारचा प्रश्न आहे. पण आमच्या ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करू नका. आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, आंदोलन सुरू करू, लाखोंच्या संख्येने आम्हीपण मुंबईत येऊ, असा इशारा ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला.
भुजबळ यांच्या अध्यक्षतेत विविध ओबीसी संघटनांची बैठक सोमवारी मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी मंगळवारपासून तालुका, जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू केले जाईल, असे जाहीर केले. ओबीसीतून आरक्षण हे मागास आयोगाच्या मार्फतच देता येते. ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नसते, ओबीसीतूनच आरक्षण याचा हट्टाग्रह कशाला, असा सवालही त्यांनी केला.
मराठा आणि कुणबी या वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा सामाजिक मागास नाहीत, असे न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला काय द्यायचे, हा पूर्णपणे सरकारचा प्रश्न आहे; पण आमच्या ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करू नका. आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, आंदोलन सुरू करू, लाखोंच्या संख्येने आम्हीपण मुंबईत येऊ, असा इशारा ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला.
भुजबळ यांच्या अध्यक्षतेत विविध ओबीसी संघटनांची बैठक सोमवारी मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्र परिषदेत त्यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी मंगळवारपासून तालुका, जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू केले जाईल, असे जाहीर केले. ते म्हणाले की, ओबीसीतून आरक्षण हे मागास आयोगाच्या मार्फतच देता येते. ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नसते. मराठा आणि कुणबी एक नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी मराठा मोर्चे निघाले. गुजरातमध्ये पाटीदार, राजस्थानात गुर्जर, हरयाणात जाट मोर्चे निघाले.
ओबीसीतच पाहिजे हा हट्टाग्रह कशासाठी?त्यावेळेला ईडब्ल्यूएसचा पर्याय पुढे आला. केंद्र सरकारने कायदा केला. ईडब्ल्यूएस लागू झाले १० टक्के. त्यात १० पैकी ८ मराठा समाजाच्या उमेदवारांनी फायदा घेतला. तरी सुद्धा काही जण ऐकायला तयार नव्हते. नंतर मराठा समाजाचे एसईबीसी वेगळे १० टक्क्याचे आरक्षण दिले. ते टिकविण्याची लढाई सुरू आहे; पण आता ओबीसीतच पाहिजे हा हट्टाग्रह कशासाठी, असा सवाल भुजबळ यांनी केला. दरम्यान, ओबीसी आरक्षण बचावसाठी ओबीसी बांधवांनी सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील सोनियानगरमध्ये उपोषण सुरू केले आहे.