शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

#MarathaReservation : मराठा युवकांचा 'सारथी' अजूनही कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 20:17 IST

मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही.

ठळक मुद्देअद्याप कार्यालयही सुरु नाही, अधिकाऱ्यांच्या नेमणूकाही प्रतीक्षेत   मराठा समाजातील युवकांच्या विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था

 प्रज्ञा केळकर -सिंग /नेहा सराफ :

       मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही. मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उदघाटन केलेल्या संस्थेचे कार्यालयही अजून तयार झालेले नाही. त्यामुळे सारथीला सरकारचे वेगवान सारथ्य नसल्याने  संस्था अजूनही कागदावरच असल्याचे समोर आले आहे.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या (बार्टी) धर्तीवर मराठा समाजासाठी सारथी संस्था उभी करण्याची करण्याची घोषणा नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात  करण्यात आली होती. मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाज यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी, प्रश्न जाणून घेऊन त्याचा सविस्तर अभ्यास, उपायोजनांसाठी ‘सारथी’ची स्थापना करण्यात येणार असल्याचा उद्देशही सांगण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने ३ जानेवारी २०१७ रोजी संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे अध्यक्षतेखाली  संस्थेची रचना, कार्य, उद्देश ठरविण्यासाठी समिती नेमली. 

          या समितीला काम करण्यासाठी सुरुवातीला पुण्यातील बालचित्रवाणी संस्थेमध्ये  कार्यालय उपलब्ध करुन देण्यात आले. २५ जून रोजी संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे काम वेगाने सुरु करण्याची ग्वाहीही देण्यात आली. मात्र अद्यापही संस्थेचे अधिकृत कार्यालय सुरु झालेले नाही. सध्या संस्थेचे काम समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत सुरु असून आवश्यक अधिकाऱ्यांची नेमणूक होणेही बाकी आहे. संस्थेचे अकाउंट काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने निधी किती मिळणार, कुठून वर्ग केला जाणार याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. फक्त नोंदणी झाल्याच्या जोरावर, यंत्रणा नसताना, कार्यालयही तयार नसताना संस्थेच्या उदघाटनाचा कार्यक्रम कसा झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

प्रतिक्रिया :

२५ जुलै रोजी ‘सारथी’ची अधिकृत नोंदणीची घोषणा करण्यात आली. संस्थेवरील पदाधिका-यांची नियुक्ती, शासनाकडून मिळणारा निधी अशा अनेक तांत्रिक बाबींवर काम सुरु आहे. ‘बालचित्रवाणी’मधील सारथीच्या कार्यालयाचे नुतनीकरण सुरु आहे. लवकरच संस्थेच्या कामाला वेग येईल.

- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष 'सारथी'

सारथीच्या रचनेचा क्रम 

  • ९ डिसेंबर २०१६  :      विधीमंडळात सारथी उभारण्याची घोषणा 
  •  ३ जानेवारी २०१७ :    डॉ सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक 
  • २५  जून २०१७      :    संस्थेची अधिकृत नोंदणी व उदघाटन समारंभ 
  • आज दिनांक         :   कार्यालय तयार नाही, आवश्यक अधिकाऱ्यांच्या नेमणुका नाहीत 
टॅग्स :PuneपुणेmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण