शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

छगन भुजबळांमागे मास्टर माईंड कोण?; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 19:08 IST

आमच्यावर झालेला हल्ला कुणी कट घडवून आणला हे कळू द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जालना – आमच्या हक्काचं आरक्षण असून आम्हाला मिळत नाही. आम्ही ओबीसींना टार्गेट केले नाही. जिथं जिथं ओबींसीवर अन्याय झाला तिथे भुजबळ जात नाहीत, सोयीनुसार भूमिका घेतात. छगन भुजबळांची दिशा चुकतेय. छगन भुजबळच मास्टरमाईंड आहे, त्यांच्यामागे कोण असणार? ते कोणाला टिकून देणार आहेत. सभा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पोटात असलेले होठात आले. करेंगे या मरेंगे हा शब्द म्हणजे तुम्ही राज्यात हिंसाचार घडवायला निघाला का? असा थेट सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना विचारला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांच्या शब्दाचा अर्थ भयनाक आहे. आम्ही भुजबळ यांचे इतके काय वाईट केले. माझे उपोषण सोडायला ओबीसी मंत्री होते, त्यांनाही मराठ्यांना आरक्षण मिळावे असे वाटते. तुम्हाला एकट्याला असं का वाटते? आमचे नुकसान झाले, आम्ही सभा घेतल्या, तरी भुजबळ आमच्याकडे आले नाहीत. सगळ्यांना वाटते, मराठ्यांनी आमच्यावर थोडेफार उपकार केलेत, मग भुजबळांना का वाटत नाही? आरक्षणापासून मराठे मरणार नाहीत. ओबीसींचे गावागावातील पोरंही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पुढे येतील हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल असं त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही हिंसाचाराचे समर्थन केले नाही, पहिल्या दिवसापासून आम्ही उग्र आंदोलन करू नका असं म्हटलं. भुजबळ म्हणतात, ओबीसी, माळी समाजाला टार्गेट केले गेले. पण बीडमध्ये तुम्ही गेला, तिथे पाहणी केली, आम्ही कुठे म्हटलं तुम्ही ओबीसी म्हणून गेलात, तशीच घटना आमच्याकडेही झाली, मग आमच्याइथं तुम्ही भेटायला आला नाही. माणसानं भानावर येऊन बोलावे, आमचे साखळी उपोषण करणारे, मराठा समाजाचे शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना टार्गेट करून त्यांना आतमध्ये टाकले जातंय. विनाकारण मराठा मुलांवर कारवाई करू नका अशी मागणी आमची आहे. आयोगाच्या माध्यमातून जे जास्तीचे आरक्षण खाल्ले जातंय ते मराठ्यांना द्या, ओबीसीतून कुठली जात काढा हे आम्ही म्हटलं नाही. आमचे आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणतोय असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिले.

दरम्यान, भुजबळ खालच्या पातळीवर बोलतायेत, न्यायदानाचे काम न्यायाधीश करतायेत, त्यांनी जीव वाचवण्याचे काम केले, आम्ही जनतेत आहोत. न्यायाधीशांबद्दल अशी भाषा असेल तर काय बोलावे? तुम्ही जीव वाचवायला आला नाही तर जीव घ्यायला आला होता. पोलिसांवर दगडफेक केला हे षडयंत्र आहे. जनतेचं काही देणेघेणे नाही. उच्चस्तरीय चौकशी लावा, आमच्यावर झालेला हल्ला कुणी कट घडवून आणला हे कळू द्या. पोलीस आता बोलतायेत, त्यांच्यावर काय दडपण आहे, सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती