शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:19 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काँग्रेस षडयंत्र आखत आहे, असा आरोप भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

मुंबई -  मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काँग्रेस षडयंत्र आखत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीमध्ये मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करावा, असे विधान केले तर आज मागास वर्ग आयोगाचा अहवाल पटलावर ठेवावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेत्यांची ही विधाने विसंगत आहेत, यामधून संभ्रम निर्माण होत आहे, असा आरोप भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.  ''दोन्ही समाजात भांडण लावून देण्याचा व असंतोष निर्माण करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी करतानाच आरक्षण विरोधक या अहवालाची चिरफाड करुन वकिलांची फौज तयार करायची व मराठा समाजाला न्यायालयात आरक्षणासाठी अडचण निर्माण करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. त्यामुळे आरक्षण देण्यापूर्वीच न्यायालयात जायचे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी भूमिका घेण्याचे निर्देश केंद्रातील हायकमांडने राज्यातील काँग्रेसला दिले असावेत. कारण सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकेल, असा आरोप शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी,''असे आवाहनही  तावडे यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणVinod Tawdeविनोद तावडेcongressकाँग्रेस