शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:40 IST

आंदोलकांनी आझाद मैदानावर बसावे, जर अन्यत्र कुठेही दिसले तर ते आमचे आंदोलक नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घ्यावी असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून सरकारकडूनही बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून याबाबत मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. हैदराबाद गॅझेटबाबत कायद्याच्या चौकटीत राहून काय तोडगा काढता येईल त्यावर सविस्तर चर्चा सुरू आहे. महाधिवक्ते या बैठकीला होते, परंतु हायकोर्टात सुनावणी असल्याने त्यांना तिथे जावे लागले. आता कोर्टाने काय निर्देश दिलेत ते पाहू. त्यानंतर पुन्हा बैठक घेऊ. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी होती, मात्र विविध ठिकाणी आंदोलक फिरत आहेत. त्यात महिला पत्रकारांवरही काही प्रसंग घडले. कुणी आंदोलन बदनाम करण्याच्या दृष्टीने आले असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार. आंदोलकांनी आझाद मैदानावर बसावे, जर अन्यत्र कुठेही दिसले तर ते आमचे आंदोलक नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घ्यावी असं त्यांनी सांगितले. 

तसेच  मराठवाड्यातील जनतेसाठी हैदराबाद गॅझेटबाबत साधारण मसुदा तयार केला आहे. परंतु तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे त्यामुळे चर्चा सुरू आहे. अजून जरांगे पाटील यांच्यासोबत मसुद्याबाबत कुठलीही चर्चा नाही. जनहित याचिकेमुळे बैठकीला विलंब झाला. हायकोर्टाचे निकालपत्र समोर आले नाही, आंदोलनाबाबत सरकारला काय निर्देश दिलेत, आंदोलकांना काय सूचना दिल्यात ते पाहून यावर भाष्य करता येईल. गॅझेटबाबत अंतिम मसुदा तयार झाला तर तो समोर ठेवता येईल. आतापर्यंत आरक्षणावर जेवढे न्यायनिवाडे झालेत त्याचा विचार तोडगा काढताना केला जात आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, आझाद मैदान वगळता इतरत्र मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांची गर्दी होत आहे. सीएसएमटी स्टेशनवर आंदोलक गर्दी करत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतंय. आंदोलनाच्या नावाखाली काही जण बाहेरून गोंधळ घालत आहेत. जनतेला वेठीस धरत आहे त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHigh Courtउच्च न्यायालय