शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:20 IST

अखेर आज, जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सरकारने जीआर काढला आणि जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. यानंतर आता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. या आंदोलनासाठी राज्यातील शेकडो मराठा बांधव मुंबईत आले होते. अखेर आज, जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सरकारने जीआर काढला आणि जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. यानंतर आता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? -मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "सर्वप्रथम मला राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रीमंडळ उपसमितीतील सर्व प्रमुख नेत्यांचे तसेच आमच्या मंत्र्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करायचे आहे. त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणावर चर्चा  करून, हा मार्ग काढला. आता हा मार्ग निघाल्याने, जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, कधी काळी त्यांच्या रक्त नात्यातील कुणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल, तर त्यांना आपल्या नियमाने ते प्रमाणपत्र (कुणबी प्रमाणपत्र) देता येते. तसेच, हैदराबाद गॅझिटियरमुळे अशा प्रकारच्या नोंदी शोधणे सोपे होणार आहे. त्यातून फॅमिली ट्री तयार करून, अशा प्रकारचे आरक्षण देता येणार आहे. म्हणजेच, ज्यांना अशा प्रकरारचा पुरावा मिळेल, त्या सर्वांना हे आरक्षण मिळेल." 

...अशा मराठा समाजाच्या लोकांनाच मिळणार फायदा -याच बरोबर, "औबीसी समाजात जी भीती होती की, सरसकट सर्वच अशा प्रकारचे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही, तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्यात शिरण्याचा प्रयत्न करतील. तर तशा प्रकारे आता याठिकाणी होणार नाही. ज्यांचा खरा क्लेम आहे. पण कागदपत्रांच्या आभावी, त्यांना तो क्लेम मिळत नव्हता. अशा मराठा समाजाच्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे. यामुळे मला असे वाटते की, मराठा समाजासाठी अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा संपूर्ण प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यात होता. कारण मराठवाड्यात नोंदी नाहीत. म्हणून मराठवाड्यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि मराठवाड्यातून इतरही भागात राहण्यासाठी गेलेल्या लोकांसाठीही हा प्रश्न महत्वाचा होता," असे फडणवीस म्हणाले. 

मला असे वाटते की, त्यावर आम्ही संवैधानिक तोडगा काढू शकलो आहोत. एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो, न्यायालयातही टिकेल आणि त्यातून लोकाना फायदा होईल. म्हणून मी स्वतः देखील मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे. त्यांनी उत्तम काम केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. या दरम्यान मुंबईकरांनाही थोडा त्रास सहन करावा लागला. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला वाटते की आपण एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला आहे," असेही फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण