शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Maratha Reservation: 'पंतप्रधानांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 19:57 IST

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. 

लातूर : मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.  जावळे पाटील म्हणाले, छावाचे संस्थापक अण्णासाहेब जावळे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने मांडला. गेली २५ वर्षे छावाचा लढा सुरू होता. त्यासाठी संघटनेने ५८ मोर्चे काढले. आज सकल मराठा समाज, क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाज एकवटला आहे. शांततेने मोर्चे काढले. आता ठोक मोर्चांनी सरकारची झोप उडविली आहे. वारंवार फसव्या घोषणा आणि सत्ताधा-यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आंदोलन पेटले. त्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने शासनकर्ते काही जणांना हाताशी धरून हे आंदोलन स्थगित करण्याच्या व दडपण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनाची धग शासनाला सोसावी लागेल. कुठेही स्थगिती होणार नाही की आंदोलन थांबणार नाही. स्वत:च्या खुर्च्या टिकविण्यासाठी जे लोक काही जणांना हाताशी धरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याशी छावा दोन हात करेल. शासन सवलतीच्या घोषणा करीत असले तरी कुठलाही अध्यादेश काढत नाही, शैक्षणिक सवलती मिळत नाहीत, असेही नानासाहेब जावळे पाटील म्हणाले. यावेळी विजयकुमार घाडगे पाटील, भगवान माकणे, राजाभाऊ गुंजरगे आदींची उपस्थिती होती.पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे सोहळे उधळणारमराठा आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जाहीर सोहळ्यांना हजेरी लावली तर सभा असो की कार्यक्रम तो उधळून लावू, असा इशाराही पत्रकार परिषदेत नानासाहेब जावळे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी अगोदर निर्णय घ्यावा आणि नंतर चर्चेला बोलवावे. केंद्र सरकार आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा विचार करीत असले, तरी ती निव्वळ चालढकल आहे, असा आरोपही जावळे यांनी केला. आमदारांनी स्टंटबाजी करू नयेआमदारांनी राजीनामा देऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा विधिमंडळात आरक्षणाचा मुद्दा प्रखरपणे मांडावा. याउलट खासदारांनी राजीनामे दिले तर केंद्रावर दबाव निर्माण होईल, असेही यावेळी जावळे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा