शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 15:09 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र ४ जूनपासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणा आंदोलनाला अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र ४ जूनपासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणा आंदोलनाला अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ, नका असं पत्र अंतरवाली सराटीमधील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाचा ४ जून रोजी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.हे आंदोलन भरकटत चालले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांश बोलत नाही आहेत, असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत.   जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये त्यांनी उपोषणे केली.  आता अंतरवाली सराटी येथे ४ जूनपासून उपोषण होणार असून येणाऱ्या काही दिवसात पावसाळाही सुरू होणार आहे. त्यामुळे उपोषणस्थळी पत्र्याचा मंडप टाकण्यात आला आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना