शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 13:02 IST

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेले भुजबळ हे समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

नाशिक : ओबीसींचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक भुजबळ फार्म येथील निवासस्थाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर असून त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेले भुजबळ हे समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आज सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, भुजबळ उपस्थित नाहीत.मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक शासकीय नोकर भरती होत असल्याचा मुद्दा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे ही भरती रद्द करावी तसेच मराठा आरक्षण शिवाय अशाप्रकारे भरती करू नये शैक्षणिक कारणासाठी मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत यासंदर्भात राज्य सरकारने वटहुकूम काढण्यासाठी तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे त्यासाठी सर्व आमदार-खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विशेष अधिवेशनाची मागणी करावी यासाठी समाजाच्या वतीने भुजबळ यांना निवेदन देण्यात येणार आहेत भुजबळ वेळेत न आल्यास त्यांच्या निवासस्थानाला निवेदन चिटकून कार्यकर्ते परतणार आहेत दरम्यान या आंदोलनामुळे भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक करण गायकर तुषार जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा