शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:00 IST

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तसंच त्यांना आक्रमक इशाराही दिला आहे.

लातूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून मराठा आरक्षण प्रश्नावरून वातावरण ढवळून काढलं आहे. सध्या लातूर दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारी लोकंच सध्या मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाज सध्या शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका. अन्यथा तुमचा सामना आमच्याशी आहे," असं आव्हान जरांगे पाटलांनी दिलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता. पण आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणाविरोधात जे लोक बोलत आहेत त्यामध्ये भाजपमधीलच काही मराठा नेतेही आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीसांनी या नेत्यांना समज द्यावी, नाहीतर उघडपणे भूमिका जाहीर करावी. मगा आम्हीही बघून घेऊ. या नेत्यांना आवरलं नाही तर आम्ही तुमचं सगळंच बाहेर काढू ," असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत जी भूमिका घेतलीय, त्यात बदल करावा अन्यथा अधिवेशनानंतर मराठे काय आहेत ते त्यांना दाखवून देऊ, असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांचाही समाचार

इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "छगन भुजबळ यांना सध्या जातीयवादाची स्वप्न पडत आहेत. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण होणार नाही. आम्ही गावखेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मराठा समाजासोबत ओबीसी समाजासह दलित, लिंगायत, बंजारा, धनगर हे सर्वजण सोबत आहेत. मात्र भुजबळ यांनी स्वार्थासाठी हे सगळं सुरू केलं आहे. भुजबळ हा प्रचंड विश्वासघाती माणूस आहे," असं जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ