शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Maratha Reservation: सर्वपक्षीय मोर्चामध्ये काँग्रेसचा सहभाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 2:16 AM

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे.

पारोळ : वसई तालुक्यात ९ जुलै ते ११ जुलै दरम्यान झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे वसईत निर्माण झालेल्या भयाण पूरस्थितीला जबाबदार असलेल्या वसई तालुक्यातील सत्ताधाऱ्यांना त्याचा जाब विचारण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे.आगामी काळात होणाºया लोकसभा - विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून गेली ४ वर्ष वसईकर जनतेच्या सुखदु:खांशी सोयरेसुतक नसलेले काही नेते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या सर्वपक्षीय मोर्चाच्या माध्यमातून करीत असून काँग्रेसची भूमिका नेहमी स्वतंत्र व कुणाच्या मागे फरफटत जाणारी नाही . निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करण्यापेक्षा काँग्रेसने मागील काळात इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, शेतकरी नुकसान भरपाई, महानगर पालिका आरोग्य केंद्रातील औषध तुटवडा, महावितरण कार्यालयावरील हल्लाबोल, जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था, तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार, कुलभूषण जाधव च्या सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीम, अनेक अनाथ आश्रम, शैक्षणिक संस्थाना मदत आदी अनेक उपक्र मातून नेहमी आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. देशातील सत्ताधाºयांच्या बेताल वर्तनाने लोकशाही धोक्यात आली असतांना लोकशाही वाचविण्याचे मोठे काम काँग्रेस करीत आहे. वसई तालुक्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून आम्ही विचारलेल्या प्रश्नांना आयुक्तांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. आणि त्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होण्यासाठीची कारणे आण ित्यावरील उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे कोणा एकाला जबाबदार धरून मोर्चे काढण्यात अर्थ नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.>प्रशासनाला सहकार्य कराअशा प्रकारचे राजकीय तुंबडी भरू मोर्चे काढण्यापेक्षा या पक्षांनी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या परीने प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असे आवाहन कॉग्रेस केले आहे.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण