शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
2
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
3
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
4
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
5
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
6
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
7
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
8
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
9
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
10
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
11
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
12
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
13
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
14
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
15
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
16
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
18
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
19
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
20
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!

मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 10:22 AM

Sambhaji Raje on Maratha reservation after supreme court order: १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) समाजाचे सुरु असलेले मूक आंदोलन हे कोल्हापूर आणि नाशिकला झाले. त्यानंतर सरकारने आमच्या ज्या मागण्या होत्या, त्यावर काम सुरु केले. त्या सरकारी असल्याने वेळ लागणार होता. म्हणून त्यांना वेळ दिला. मूक आंदोलन यामुळे तात्पुरते बंद केले आहे. पूर्णपणे थांबवलेले नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje) आता केंद्रालाच थेट इशारा दिला आहे. (sambhaji raje warn Central government on Maratha reservation role.)

आम्ही राज्यभरात दौरा करणार आहोत. १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. यामुळे रिव्ह्यू पिटीशन टाकणे उपयोगाचे नाही, असे संभाजीराजे म्हणाले. 

गायकवाड अहवालात ज्या त्रूटी आहेत. त्या त्रूटी दूर करून तो अहवाल राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पाठविता येईल. राष्ट्रपतींकडून तो केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे व तिथून तो राज्याच्या आयोगाकडे देता येऊ शकतो. केंद्राला विनंती आहे की, वटहुकूम काढावा आणि त्यानुसार घटनादुरुस्ती करावी, जेणेकरून राज्याला अधिकार मिळतील, असे पर्याय आपल्यासमोर आहेत, असे ते म्हणाले. 

राज्य सरकार राज्यपालांकडे ३३८ ब च्या माध्यमातून शिफारस करू शकते. हा एक पर्यायी मार्ग आहे. केंद्र सरकारला आता आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. आता केंद्र, राज्य असे चालणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. 

राज्याला वेळ का दिला....१६-१७ जुन्या मागण्या आहेत. आम्ही ५-६ मागण्याच राज्य सरकारसमोर ठेवल्या. त्यापैकी सारथीची प्रक्रिया सुरु झाली आहे. अन्य मागण्यांवर काम सुरु आहे. चांगले झाले तर कौतुक करावे लागेल, चुकीचे असेल तर विरोध केला पाहिजे. टीका करून मुलांचे प्रश्न सुटतील असे नाही. यामुळे आम्ही माघार घेतलेली नाही, सरकारला वेळ दिलाय, असे संभाजीराजे म्हणाले. आपल्याकडे १० -१५ दिवस आहेत. पाहू पुढे काय होतेय. कोरोनामुळे लोकांना रस्त्यावर आणावे, हे पटत नाही. ओबीसींच्या देखील काही अडचणी आहेत. आपल्याला एकत्र रहायचे आहे. आपली सामाजिक रचना एकत्र राहिली पाहिजे, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीCentral Governmentकेंद्र सरकार