शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मान्यवरांचे शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 02:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात समन्वय आणि संवाद साधण्याच्या उद्देशाने बोलाविलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात समन्वय आणि संवाद साधण्याच्या उद्देशाने बोलाविलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन काढून शांततेचे आवाहन करण्यात आले.सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला साहित्य, संस्कृती, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते. मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी शासनाने तत्काळ उचित पावले उचलावीत, असे आवाहन या मान्यवरांनी बैठकीत केले. तसेच, राज्यात शांतता प्रस्थापिक करण्याच्या दृष्टीने कुठेही हिंसाचार होऊ नये. तसेच कुणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यात आले.ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, प्रसिद्ध विचारवंत सदानंद मोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, समाजसेवक पोपटराव पवार, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, उद्योगपती बी. बी. ठोंबरे, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अलिबागचे रघुजीराजे आंग्रे, उल्हास घोसाळकर, जिजाबराव पवार, सतीश परब, अ‍ॅड. शैलेश म्हस्के, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, तानाजीराव शिंदे आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, एकनाथ शिंदे, सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर हे मंत्रीही बैठकीला उपस्थित होते. शाहू छत्रपती, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे मात्र उपस्थित नव्हते.निश्चित वेळेत आरक्षण देणार - मुख्यमंत्रीराज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत. कालबद्ध आणि निश्चित वेळेत आम्ही आरक्षण देऊ असा मला विश्वास आहे. आजच्या बैठकीत विचारवंतांनी केलेल्या आवाहनामुळे राज्यात शांततरा प्रस्थापित होण्यास मोलाचे सहकार्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र