शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Maratha Reservation: राज्यात आंदोलन अद्याप धगधगतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 03:13 IST

मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली. जलसमाधी, रास्ता रोको, ठिय्या आंदोलनाद्वारे मराठा क्रांती संघटनेने सरकारवर दबाव कायम ठेवला आहे.हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात जाळपोळ आणि रस्ता रोको झाला. औरंगाबादमध्ये सहा कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच हे आंदोलक खाली उतरले. परळीत ठिय्या आंदोलनाच्या अकराव्या दिवशी माजी. खा. रजनी पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली.नाशिकमध्ये भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन झाले. सानप व महापौर रंजना भानसी यांनी पाठपुराव्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तहसीलवर ठोक मोर्चा काढण्यात आला.पवार कोल्हापूरला आंदोलनात सहभागी!राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास भेट दिली व कार्यकर्त्यांसमोरही भूमिका मांडली. पवार स्वत: अर्धा तास त्या आंदोलनातसहभागी झाले होते. हे आंदोलन संयमाने पुढे न्या, असा सल्लाही त्यांनी दिला.अश्रुधूर, प्लॅस्टिक बुलेटचा मारापरभणी जिल्ह्यात टाकळी कुंभकर्ण येथे सकाळपासूनच युवकांनी रस्ते अडवून धरले़ आंदोलन सुरू असतानाच दगडफेक सुरू झाली. जमाव पांगविण्यासाठी दुपारी १२़३० वाजता पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यात १३ फैरी झाडण्यात आल्या़ त्यानंतरही जमाव शांत होत नसल्याने, दुपारी १़३० वाजता पोलिसांनी पुन्हा हवेत १७ फैरी झाडल्या. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पोलिसांनी आंदोलकांवर प्लॅस्टिक बुलेट झाडल्या. त्यात तीन आंदोलक जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात आंदोलकांनी एक बस व रुग्णवाहिका पेटविली.आज लातूरला बैठकमराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरातील समन्वयक लातुरात आले आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी येथे बैठक होणार आहे. यात शांततापूर्ण निदर्शने जाळपोळ, तोडफोड आदी घडामोडींचा आढावा घेतला जाईल.मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अडथळा आणूमुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारी जळगाव व सोमवारी सांगली येथे होणाºया सभेत अडथळा आणण्याचा इशारा क्रांती मोर्चाने दिला दिला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्र