शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:35 IST

मराठा ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई - रोज रोज भूमिका बदलू नका, २८८ उमेदवार उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल २८८ उमेदवार उभे करा हे आमचं आव्हान आहे. प्रत्येक वेळी बदलायचं कारण काय, आज उपोषणाला बसतात आणि दुसऱ्या दिवशी उठतात अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, आता जरांगे मुस्लिमांनीही आरक्षण द्या बोलतायेत परंतु मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात २५ वर्षापूर्वी आरक्षण दिलं. इकडे माळी समाज, तिकडे बागवान, इकडे खाटीक तिकडे कुरेशी, इकडे कासार तिकडे मण्यार असं मुस्लीम समाजाला आरक्षण दिलंय. पण माहिती नसलेल्या गोष्टी अर्धवट माहिती असणारे लोक बोलतात. मध्येच बोलतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी हे करणार वैगेरे...तू एकच काम कर २८८ जागा लढव असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या कार्यक्रमात भुजबळांनी हे विधान केले आहे. 

तसेच मनोज जरांगेंनी स्वत: माझ्यासमोर निवडणुकीत उभं राहावे. माझ्यासमोर उभं राहावे ही माझी इच्छा आहे. मला पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. ओबीसींचे आरक्षण आणि त्यांचे संरक्षण करणे हे माझे काम आहे.  मग ते सरकारमध्ये काय किंवा रस्त्यावर काय, भुजबळाला या ५७-५८ वर्षात सवयच आहे. रस्त्यावरही लढायची आणि सरकारमध्येही काम करायची त्यामुळे मला चिंता नाही. येवला मतदारसंघात कुणीही लढावं मी त्याच्याविरोधात १ लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला.

दरम्यान, यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली तर आम्हाला राजकारण नको, राजकारणात जायचं नाही असं बोलणार त्यानंतर पुन्हा पाडायच्या भाषा वापरणार, २८८ उमेदवार उभे करण्याची भाषा करणार. पुन्हा एकेकाला बोलावून माहिती घेणार, काहीतरी सर्व्हेक्षण करणार त्यामुळे मनोज जरांगेंना फारसं गांभीर्याने मी घेत नाही असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ