शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"तू खरा पाटील असेल तर..."; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:05 IST

ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आहे. तुला थोडीतरी अक्कल पाहिजे अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली.

मुंबई - Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil ( Marathi News ) मराठा आरक्षणाच्या ओबीसी समावेशाला मंत्री छगन भुजबळ सातत्याने विरोध करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन असा इशारा देत आहेत. त्यावर तुझी हिंमत असेल आणि जरांगे तू खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला आव्हान दे, मंडल आयोग संपवून दाखव असा प्रतिइशाराच भुजबळांनी दिला आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या हे आमचे म्हणणं आहे. सुक्रे आयोगाच्या माध्यामातून ते काम होतंय. त्याला कायद्याचे स्वरुप देण्याचे काम कदाचित विशेष अधिवेशन घेऊन करण्यात येईल अशी माहिती आहे. सरकारने ते करावे. आमचा पाठिंबा आहे. परंतु जे खोटे कुणबी दाखवून ओबीसीत घुसवले आहेत त्यांना ओबीसीऐवजी वेगळ्या आरक्षणात टाकावे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जरांगे पाटील स्वत: ला काय समजतो, प्रत्येकवेळी अल्टिमेटम देतो. इथं लोकशाही आहे की हुकुमशाही चालली आहे?. मी राजीनामा दिलाय की नाही याबाबत जरांगेंना म्हणाव, तुम्ही ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ऐका त्यांना विचारा असा टोला भुजबळांनी लगावला. त्याचसोबत नाभिक समाजातील संघटनांनी पत्रक काढून स्पष्ट केले आहे. मी भाषणात कुठल्याही प्रकारे नाभिक समाजाने मराठा समाजावार बहिष्कार टाकावा असं म्हटलो नाही. ते एका गावापुरते मर्यादित होते. पण एक दोन खोडसाळ लोकांनी ध चा मा करून वेगळं वातावरण तयार केले असं भुजबळांनी स्पष्ट सांगितले. 

दरम्यान, ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आहे. तुला थोडीतरी अक्कल पाहिजे. तु ते खल्लास करणार म्हणून सांगतो आणि ओबीसीत आरक्षण घेणार बोलतो. एवढीही अक्कल नाही अशी संतप्त भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण