शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुन्हा एल्गार! मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार; सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 20:50 IST

उपोषणासह कमळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

- चेतन ननावरेमुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर अंमलबजावणीच होत नसल्याचा आरोप करत एका गटाने २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. तर दुसऱ्या गटाने लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी झाली नाही, तर भाजपाच्या कमळ चिन्हावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर म्हणाले की, सरकारने आरक्षणाची घोषणा केली असली, तरी न्यायालयात प्रकरण गेल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ मराठा समाजाला अद्याप तरी मिळालेला नाही. कोपर्डी घटनेतील आरोपी प्रत्यक्ष शिक्षेपासून दूर आहेत. अ‍ॅट्रोसिटी कायद्यात शिथिलता आणण्याचे आश्वासनही हवेतच विरल्याचे दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाजासाठी सुरू केलेल्या सारथी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, मात्र त्याला निधीची तरतूद केली नसल्याने ते नावापुरतेच आहे. शिवस्मारकाबाबत सरकार उंची कमी-जास्त करणे आणि विविध पूजा करण्यातच अधिक व्यस्त आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर सरकार एक शब्दही काढत नाही. चार जिल्ह्यांतील भाडेतत्त्वावर असलेल्या वसतिगृहांचा अपवाद वगळता एकही कायमस्वरूपी वसतिगृह मराठा विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने या मान्य केलेल्या मागण्यांवर ठोस अंमलबजावणी केली नाही, तर लोकसभा निवडणुकीत मराठा समाज कमळावर बहिष्कार टाकेल, असा निर्णय पंढरपूर येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत झाल्याचे पोखरकर यांनी सांगितले.मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले की, याआधी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. याउलट आंदोलनात सामील झालेल्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले नाही. सरकारने केलेल्या या फसवणुकीविरोधात मराठा समाज २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसेल. 

कर्ज वितरणातही गाजरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत मालमत्ता तारण नसलेल्या मराठा तरुणांना कर्ज मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुळात ज्या तरुणांना कोणत्याही बँकेकडे मालमत्ता तारण ठेवून कर्ज मिळू शकते, अशाच तरुणांना महामंडळ कर्ज देत आहे. त्यामुळे खऱ्या गरजू तरुणांना कर्जापासून वंचित ठेवत सरकारने मराठा समाजाला पुन्हा एकदा गाजर दाखवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

...तर कमळावर बहिष्कारनिवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर ठोस अंमलबजावणी न केल्यास लोकसभा निवडणुकीत मराठा समाज कमळावर बहिष्कार टाकेल, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनreservationआरक्षण