शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; "छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:51 IST

मंत्री छगन भुजबळ  आज त्यांच्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत.

जालना - मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध अद्याप सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण द्या परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका भुजबळांनी मांडली. त्यामुळे भुजबळ सध्या मराठा समाजाच्या टार्गेटवर आहेत. नाशिक इथं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री भुजबळ पाहणी दौरा करत आहेत. यातही मराठा समाजाने त्यांना विरोध केला. तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख करत भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये अशी खोचक प्रतिक्रिया दिली. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्यावर काही बोलायचे नाही. मराठा समाजच नव्हे तर ओबीसी समाजही त्यांना विरोध करतोय. तो काय माणूस आहे का? कायद्याच्या पदावर बसतो आणि काहीही बरळतो.बांधावर कशाला जातो, आणखी पीक खराब होईल. पावसाने आधीच शेतकऱ्यांचे वाटोळे केलंय तू तिथं जाऊन आणखी कशाला करतो. भुजबळांची सावलीही कुणावर पडू देऊ नये कुणावर..इतका खालच्या विचारांचा तो माणूस आहे. घटनेच्या पदावर बसतो आणि कायदाच पायदळी तुडवतो. जातीजातीत तेढ निर्माण करतो. ओबीसी-मराठा बांधव गावखेड्यात एकत्र आहेत. हा उगाच कलंक आहे असं त्यांनी सांगितले. 

तर १ ते १२ डिसेंबरच्या काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश असा दौरा करणार आहे. घराघरातील मराठा समाज आरक्षणाच्या लढाईत उतरला आहे. आतापर्यंत ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. २४ डिसेंबरपर्यंत आम्ही डेडलाईन दिली आहे. दगाफटका होणार नाही तरीही आम्ही सज्ज आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १०० टक्के मराठा समाजाला आरक्षण देणार कारण ते नाराजी पत्करू शकत नाहीत. मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नसेल. दोन्ही उपमुख्यमंत्रीही त्यांना पाठिंबा देतील. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत सरकार मराठा आरक्षण देईल अशी खात्री आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

भुजबळांच्या पाहणी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोधमंत्री छगन भुजबळ  आज त्यांच्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी कोटमगाव येथे त्यांना मराठा आंदोलक शेतकरी जमा झाले. तेव्हा आंदोलकांनी भुजबळ गो बॅक च्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच होय, सातबारा आमच्याच बापाचा असल्याचे सांगत भुजबळ यांना बांधावर पाहणीसाठी जाण्यास विरोध दर्शविला आहे. यावेळी मोठया संख्येने मराठा आंदोलक जमा झाले होते.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील