माओवाद्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

By Admin | Updated: July 30, 2015 03:20 IST2015-07-30T03:20:25+5:302015-07-30T03:20:25+5:30

माओवादी संघटनांतर्फे मंगळवारपासून नक्षल शहीद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या काळातच मंगळवारी मध्यरात्री धानोरा तालुक्याच्या गोडलवाही येथे

Maoists kill former Sarpanch killer | माओवाद्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

माओवाद्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

धानोरा (गडचिरोली) : माओवादी संघटनांतर्फे मंगळवारपासून नक्षल शहीद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या काळातच मंगळवारी मध्यरात्री धानोरा तालुक्याच्या गोडलवाही येथे नक्षलवाद्यांनी माजी सरपंचाची गोळी घालून हत्या केल्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम गावांमध्ये दहशत पसरली आहे.
गोडलवाही टोला गावात चार सशस्त्र नक्षलवादी रात्री आले व त्यांनी देवराव रामसू किरंगे (३०) यांचे घर गाठले आणि हातपाय बांधून देवरावला कोंदावाही मार्गावर आणले. येथे त्याला बेदम मारहाण केली. या वेळी ४० ते ५० लोकांचा जमाव घटनास्थळावर उपस्थित होता, अशी माहिती मिळाली आहे. नंतर त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गोडलवाही पोलीस मदत केंद्रापासून दोन किमी अंतरावर ही घटना घडली. देवरावच्या पश्चात पत्नी वनिता व दोन मुले आहेत. २०१० पासून देवराव किरंगे गोडलवाहीचे पाच वर्षे सरपंच होते. (प्रतिनिधी)

Web Title: Maoists kill former Sarpanch killer