शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांनी पळविल्या वनकर्मचाऱ्यांच्या बंदुका

By admin | Updated: December 21, 2014 01:45 IST

जंगलात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या.

गडचिरोली : जंगलात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या. ही घटना शनिवारी दुपारी अहेरी तालुक्यातील कोंजेड येथे घडली. या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला असून रात्री उशिरा जिमलगट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिरोंचा वनक्षेत्रात येणाऱ्या देचलीपेठा वनपरिसरातील कोंजेड येथे आज शनिवारी वनविभागाचे कर्मचारी लाकूड तस्करांच्या मागावर होते. दरम्यान कोंजेड जंगलात गस्त घालत असताना लपून बसलेल्या माओवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंच्या ताब्यातील तीन बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे पळविली. त्यानंतर हे कर्मचारी जंगलातून सायंकाळी उशिरा जिमलगट्टा येथे पोहोचले. त्यानंतर ते जिमलगट्टा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला.महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदीपात्रातून सागवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने वनविभागाला शस्त्रे पुरविली होती. लाकडे वाहून नेताना कुणी दिसत असेल व अडवूनही थांबत नसेल तर शस्त्राचा वापर करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने तस्करांवर नजर ठेवून आहेत. (प्रतिनिधी)पोलिसांनी केले होते अलर्टगस्तीवर जाण्यापूर्वी वनकर्मचाऱ्यांना शस्त्रे पोलीस ठाण्यातून न्यावी लागतात. त्यामुळे आज दुपारला कोंजेड जंगलात तस्कर असल्याची माहिती मिळताच वनकर्मचारी बंदुका घेण्यासाठी जिमलगट्टा पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी कोंजेड जंगलात माओवादी असल्याचे पोलिसांनी सांगून वनकर्मचाऱ्यांना अलर्ट केले होते.