पोटच्या मुलीवर अनेक वर्षांपासून करत होता बलात्कार, 3 वेळेस केला गर्भपात
By Admin | Updated: September 17, 2016 20:19 IST2016-09-17T20:19:26+5:302016-09-17T20:19:26+5:30
स्वतःच्याच मुलीवर अनेक वर्षांपासून बलात्कार करणा-या नराधम पित्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.

पोटच्या मुलीवर अनेक वर्षांपासून करत होता बलात्कार, 3 वेळेस केला गर्भपात
>ऑनलाइन लोकमत
पालघर,दि.17- स्वतःच्याच मुलीवर अनेक वर्षांपासून बलात्कार करणा-या नराधम पित्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. तुलिंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2011 मध्ये पत्नीचं निधन झाल्यापासून 47 वर्षीय नराधम बाप स्वतःच्याच मुलीवर सातत्याने जबरदस्ती करत होता. त्याने 3 वेळेस 20 वर्षीय पीडित मुलीचा गर्भपातही घडवून आणला.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार,आईचा मृत्यू झाल्यानंतर अनेकदा तिच्या वडिलांनी तिचं यौनशोषण केलं. तीन वेळेस ती गर्भवतीही राहिली होती. वडिलांनी काही औषधं देऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा सातत्याने तिच्यावर बलात्कार करण्यात येत होता, नुकताच तिने एका मुलीलाही जन्म दिला.
आरोपीला काल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि बळजबरीने गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पॉक्सो कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.