शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:57 IST

Shiv Sena Shinde Group News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असून, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. 

Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला पडलेले खिंडार अधिकच विस्तारत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना, ठाकरे गटातीलच अनेक जण नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यभरातून ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसत आहे. अनेक वर्षे पक्षात कार्यरत असलेले पदाधिकारी, नेते उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत, शिवसेना शिंदे गटात सामील होत आहे. त्यामुळे आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असून, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील मंचर, अहिल्यानगर तसेच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करून दिली आहे. 

पुण्यातील रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजुभाऊ बनसोडे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी तसेच मंचर तालुक्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आणि आदर्श सरपंच दत्ता गांजळे, ठाकरे गटाचे मंचर शहरप्रमुख विकास जाधव, सुवर्णा डोंगरे तसेच ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उल्हासनगरमधील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी महिला अध्यक्ष व माजी उपमहापौर जया साधवानी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक आणि राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश साधवानी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, अहिल्यानगर मनसेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माळी तसेच पारनेर आणि जामगावचे ठाकरे गट, मनसेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अनिल शेंडगे, माजी पंचायत समिती सभापती नंदा शेंडगे, माजी नगरसेवक अर्जुन शेट्टे, सोमनाथ खांदे, चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश पाटील, ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे