शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच

By यदू जोशी | Updated: December 30, 2018 01:11 IST

नगरच्या युतीला अभद्र म्हटले गेले. मात्र अभद्रपणाचा राजकीय खेळ अनेक ठिकाणी सुरू आहे.

मुंबई : अहमदनगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीवर टीका होत असताना काही जिल्हा परिषदा आणि नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आहेत तर कुठे काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी असे समीकरण आहे. नगरच्या युतीला अभद्र म्हटले गेले. मात्र अभद्रपणाचा राजकीय खेळ अनेक ठिकाणी सुरू आहे.यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी अशी युती आहे. तिथे अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद भाजपाकडे आहे. शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी अन्य तिघे एकत्र आले आहेत. ही युती अभद्र असून ती तोडली पाहिजे, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यंतरी मांडली होती. तेथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या गटाच्या आहेत.ज्या विखे पाटील यांना यवतमाळची युती अभद्र वाटते त्यांच्याच अहमदनगरमधील जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित आहेत. विखे यांच्या पत्नी शालिनीताई अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा आहे. अहमदनगर पंचायत समितीमध्ये काँग्रेस-शिवसेना एकत्र आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीचे सभापतीपद काँग्रेसकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे आहे. आर्णीचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे.अमरावती जिल्हा परिषदेत भाजपाला बाजूला ठेवत काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र नांदत आहेत. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपालिकेत भाजपा -काँग्रेस- राष्ट्रवादी अशी युती आहे. तेथे सर्वांनी मिळून शिवसेनेला बाजूला ठेवले आहे.बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपा-राष्ट्रवादी अशी युती आहे. त्यात अध्यक्षपद भाजपाकडे असून उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरपालिकेत भाजपा-राष्ट्रवादी एकत्र आहेत.नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस-शिवसेनेने चक्क एकत्र लढविली होती. काँग्रेसचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना तेथे नगराध्यक्ष आहेत तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या आई कालपर्यंत उपनगराध्यक्ष होत्या. आज त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपदही काँग्रेसला मिळाले आहे.ुयुतीचा बीड पॅटर्न तर एकदम अनोखा आहे. तिथे राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी भाजपा-शिवसेना-काँग्रेस-शिवसंग्राम एकत्र आहेत. अध्यक्षपद भाजपाकडे आहे. परभणीची त-हा आणखीच वेगळी. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-भाजपाची युती आहे. पंचायत समितीत भाजपा-काँग्रेस सोबत आहेत. परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. अशा अनेक स्थानिक आघाड्या आहेत.मग कारणे दाखवा नोटीस का?अहमदनगरमध्ये भाजपाला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पण अन्यत्र राष्ट्रवादी भाजपा वा शिवसेनेसोबत आहे तिथे सत्तेची चव राष्ट्रवादीचे लोक आरामात चाखत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा