शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीत अनेक रहस्य, ते लवकरच..."; रवी राणांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 13:46 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

मुंबई-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यात आता आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक रहस्य आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील आहेत, असं रवी राणा म्हणाले. अजित पवारांच्या दिल्लीवारीबाबत ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

"अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामांना ज्या पद्धतीनं पाठिंबा देत विकासाला साथ दिली. तशीच शरद पवार यांनीही द्यावी यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक रहस्य आहेत. मला ठाम विश्वास आहे की शरद पवारही पंतप्रधान मोदींच्या विकास कामांनी प्रभावित होऊन लवकरच त्यांना पाठिंबा देतील. लवकरच अशा प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायला मिळू शकतं", असं रवी राणा म्हणाले. 

शरद पवार काय म्हणाले?दरम्यान, अजित पवारांसोबतच्या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चा होत असताना खुद्द शरद पवार यांनी आपली बाजू मांडली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात. वेळप्रसंगी त्यांना संकटांनाही तोंड द्यावे लागते. मात्र आयुष्यातील काही दिवस असे असतात की, या सर्व संकटांना विस्मरण करून आनंदाने कुटुंबाच्यासमवेत दिवस घालवावं जगावे, अशी इच्छा असते, असं म्हणत पवारांनी सूचक विधान केलं. महाराष्ट्रासह संबंध देशात लोक आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी येऊ व पुढील इच्छा आकांक्षांना यश मिळो, अशा शुभकामना दिवाळीनिमित्त शरद पवारांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार