शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 05:04 IST

ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला.

मुंबई : केंद्र सरकारने जर काही महिन्यांपूर्वी घरोघरी जाऊन कोरोनावरील लस दिली असती, तर  अनेक ज्येष्ठ नागरिकांचे विशेषतः समाजातील नामांकित व्यक्तींचे जीव वाचविता आले असते, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले.ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला. ७५ वर्षांवरील नागरिक, अंथरुणावर खिळलेले रुग्ण आणि दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात यावी, अशी  मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेल्या धृती कपाडिया आणि कुणाल  तिवारी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी केलेल्या सूचनेची आठवण केंद्र सरकारला करून दिली. न्यायालयाने केंद्र सरकारला घरोघरी जाऊन लस न देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली होती. ‘ही सूचना करून तीन आठवडे झाले तरी केंद्र सरकारने आम्हाला या धोरणाबाबत काहीच सांगितले नाही. सरकारने यावर निर्णय घ्यावा,’ असे म्हणत न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत १९ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

अनेक ज्येष्ठ लोक तर काही व्हीलचेअर असलेले नागरिक लसीकरण केंद्रांवर ताटकळत उभे असल्याचे अनेक फोटो आम्ही पाहिले आहेत. हे हृदयद्रावक चित्र आहे. ही काही चांगली बाब नाही. त्यांना आधीच अनेक व्याधी असतात आणि या रांगेत उभे राहून ते कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका पत्करतात.   - न्यायालय 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHigh Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार