शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार लवकरच मोठा धमाका करणार? भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:42 IST

पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खळबळजनक दावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना पवारांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. पुण्यातले काही भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी अजित पवार भाजपला धक्का देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्त्वाखाली लढली जाणार आहे. पुण्यातील भाजपचे काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पण मी खालच्या पातळीवरचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिलेली आहे. पालिका हाती असल्यास चांगलं काम करता येतं, असं अजित पवार म्हणाले.'भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे असताना सर्वकाही सुरळीत होतं'

विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवूनच आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे काम केलं. पण २०१३-१४ मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती. त्यामुळेच चांगलं काम करूनही आम्हाला पराभव पत्करावा लागला. मात्र आता भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ज्यांना यायचं आहे, त्यांनी अपात्र ठरता कामा नये, असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण अपात्र ठरल्यावर ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही. आत्ता जे पक्षात आले आहेत, ते अपक्ष आहेत. असेही काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा पवारांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपा