उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाचा बलात्कार

By Admin | Updated: July 20, 2014 01:48 IST2014-07-20T01:48:48+5:302014-07-20T01:48:48+5:30

संसारात आलेले विघ्न तंत्रमंत्रने दूर करण्याचे स्वप्न दाखवून एका मांत्रिकाने विवाहितेवर तब्बल दोन वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

Mantralaya rape in the name of treatment | उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाचा बलात्कार

उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाचा बलात्कार

औरंगाबाद : संसारात आलेले विघ्न तंत्रमंत्रने दूर करण्याचे स्वप्न दाखवून एका मांत्रिकाने विवाहितेवर तब्बल दोन वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. शेख सलीम शेख मोहंमद ऊर्फ बाबा (38) असे या भोंदूबाबाचे नाव असून, त्याला क्रांतीचौक पोलिसांनी रात्री बेडय़ा ठोकल्या. 
शहरातील पैठणगेट परिसरातील माहेर असलेल्या 33 वर्षीय पीडित महिलेचे सासर हैदराबादेत आहे. 2क्12 मध्ये तिचे आणि पतीचे घरगुती कारणावरून खटके उडू लागले. शेवटी ही महिला माहेरी निघून आली. माहेरच्यांनी तिची आणि तिच्या पतीची समजूत घातली; परंतु त्यांचे काही जमेना. संसार तुटण्यार्पयत परिस्थिती येऊन ठेपली होती. सर्व पर्याय वापरल्यानंतर शेवटी शेख सलीम बाबाकडे बहिणीला नेऊन पाहू, असा महिलेच्या भावाने विचार केला. ऑगस्ट 2क्12 मध्ये भाऊ तिला मसनतपूर येथे या बाबाच्या घरी घेऊन गेला. बाबाला त्यांनी संसारात कसे विघ्न आले आहे, हे सांगितले. बाबाने ‘तुङयावर तातडीने जादुई उपचार करावे लागणार आहेत. नाही तर तुझा संसार तुटलाच समज’ असे सांगितले. मग उपचाराच्या बहाण्याने बाबा तिला घरातील दुस:या खोलीत घेऊन गेला. 

 

Web Title: Mantralaya rape in the name of treatment