शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निवासात भ्रष्टाचाराचा ‘मनोरा’; काम न करताच बिले, २८ आमदारांच्या खोल्यांमध्ये काम दाखवून लूट

By यदू जोशी | Updated: November 11, 2017 05:55 IST

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘मनोरा’ आमदार निवास आणि ‘आकाशवाणी’ आमदार निवासात ३ कोटी रुपयांहून अधिकची देखभाल, दुरुस्तीची कामे न करताच अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने

मुंबई : मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘मनोरा’ आमदार निवास आणि ‘आकाशवाणी’ आमदार निवासात ३ कोटी रुपयांहून अधिकची देखभाल, दुरुस्तीची कामे न करताच अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने पैसा लाटल्याचा आरोप करणारे पत्र भाजपाच्याच एका आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.दहा आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच लाखो रुपये उकळण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी यांनी म्हटले असून त्यांनी केलेल्या चौकशीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता भूषणकुमार फेगडे आणि शाखा अभियंता धोंडगे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यातील फेगडे व धोंडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. वाळके यांची केवळ बदली करण्यात आली आहे. चौकशीमध्ये भ्रष्टाचार समोर आल्यानंतरही अद्याप अधिकारी वा कंत्राटदारांविरुद्ध बांधकाम विभागामार्फत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.आता या दहा व्यतिरिक्त आणखी १८ आमदारांच्या खोल्यांमध्ये कोणतेही काम न करता कंत्राटदारांना पैसा देण्यात आल्याचे पत्र आमदार चरणदास वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह दिले आहे. या प्रकरणाची चौकशी आता बांधकाम विभागाच्या दक्षता पथक मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्याकडे देण्यात आली आहे. बहुतेक प्रकरणात निविदा काढून तीन महिन्यांच्या आत कामे झाल्याचे दाखवत कंत्राटदारांना बिलेदेखील अदा करण्यात आली.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार