शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मनोज जरांगे यांचे मुंबईकडे प्रस्थान; आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:30 IST

थांबविण्यासाठी मराठा समाज बांधवांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/वडीगोद्री : सलाईनमधून विषप्रयोग करणे, एन्काउंटर करण्यासह इतर मार्गांनी मला संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे-पाटील यांनी बैठकीतूनच मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली. जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे, यासाठी त्यांची मनधरणी करताना समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागली.

जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक बोलाविली होती. बैठकीत ते म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी समाजाचा आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पाठबळामुळे काही जण समोर येऊन आरोप करीत आहेत. उपोषणात मरू द्यावे, सलाईनमधून विष द्यावे, एन्काउंटर करावे, ४२० दाखल करून जेलमध्ये घालावे, असे फडणवीस यांना वाटते, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला.

...अन् जरांगे निघाले!काहींना पुढे करून पैसा पुरविला जात आहे. आजवर एकाही महिलेची तक्रार माझ्या विरोधात नाही. परंतु, गंभीर आरोप केले जात आहेत, असे जरांगे म्हणाले.माझा बळी घ्यायचा आहे तर मी सागर बंगल्यावर येतो. एक तर माझा बळी देतो किंवा सगेसोयऱ्यांचा कायदा घेऊन येतो, असे म्हणत जरांगे यांनी बैठकीतूनच फडणवीस यांच्या बंगल्याकडे प्रस्थान केले. समाजबांधवांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

असा झाला प्रवासदुपारी १ वा. : बैठक सुरु,मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील सागर बंगल्यावर जात आहेत. ते अंतरवाली सराटीतून निघाले असून, समाज बांधवाच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. तेथून पैठण, बिडकीन, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे आणि मुंबई येथील सागर बंगल्यावर जरांगे पाटील जाणार आहेत.

जरांगे यांना आली भोवळ, भांबेरीत चार तासांचा थांबामुंबईकडे जाण्यासाठी जरांगे-पाटील भांबेरी मार्गे निघाले. परंतु, १६ दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी मुंबईकडे जाऊ नये, यासाठी समाजबांधव विनवणी करीत होते. काहींनी रस्त्यावर झोपून त्यांना थांबविण्याचा प्रयल केला. परंतु, जरांगे ठाम होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना भोवळ आली. त्यानंतर एका वाहनात बसून ते मुंबईकडे निघाले.

या मार्गे जाणार जरांगे-पाटील मुंबईलाभांबेरी गावात जरांगे यांना समाजबांधव, महिलांनी थांबविले. नारायण गडचे महंत शिवाजी महाराज यांनी समाजाच्या विनंतीनुसार जरांगे यांनी जेवण करावे, असा आग्रह केला. त्यानुसार जरांगे यांनी भांबेरी येथे थांबण्यास सहमती दिली. परंतु, उपोषण सोडणार नसल्याचे सांगत चार तास थांबण्यासाठी तयारी दर्शविली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण