शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:27 IST

Manoj Jarange Patil News: २५ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करणार. हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil News: आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, या शब्दांत मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. कोणाचेही बाप येऊ द्यात, ते मॅटर मी दबू देणार नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला एकमेकांना मोबाइलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

२५ जानेवारीपासून उपोषण सुरू करणार, आरक्षणासाठी लढा देणार

२५ जानेवारी २०२५ पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. मराठा आरक्षणासाठी लढा देणार आहे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल. राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचे आहे. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे, असे आदेश मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिले आहेत. 

दरम्यान, माझे गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायच्या आहेत. सर्वांनी पत्रिका छापायच्या, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचे. २५ जानेवारी २०२५ ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, अशी सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो आणि धनगर आणि मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही तेही पाहणार आहे, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. आहे. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणMahayutiमहायुती