शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- "देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 18:32 IST

मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड गंभीर आरोप केले आहेत

Ashish Shelar on Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis, Maratha Reservation,  मराठा समाजाला न्याय मिळाला, आरक्षण मिळावं या भूमिकेचे समर्थक भारतीय जनता पार्टी आहे. आतादेखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान, अधिवेशनात भाजपाने मराठा आरक्षणाला समर्थन दिले आहे. समाज जे मागतोय त्या बाबींची कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम मनोज जरांगे पाटीलांनीही मान्य केले होते. आधीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा न्यायिक आरक्षण दिले होते. त्यामुळे अशा व्यक्तीवर बिनबुडाचे आरोप करणे आम्हाला मान्य नाही, असमर्थनीय आहेत, अशा शब्दांत जरांगे पाटील यांच्या आरोपांवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मत व्यक्त केले.

"समाजाला न्याय मिळवून देऊ हीच या सरकारची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्क्यांचे टीकणारे आरक्षण दिले आहे. अन्य जे विषय प्रलंबित आहेत, ते विषय चर्चेने सोडवले जाऊ शकतात. या साऱ्या गोष्टींना राजकीय रंग देणे मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आग्रही आहे. याबाबतीत राजकारण करता कामा नये," असे इशारावजा सल्ला त्यांनी साऱ्यांनी दिला.

"सलाइनमधून विषप्रयोगाचा प्रयत्न हे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलायला हवे. देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिल्यास, ते कुठेही वेडीवाकडी भाषा वापरताना दिसलेले नाहीत, राजकीय वितुष्ट वाढवताना दिसलेले नाहीत, संविधान आणि कायदा याच्या पलिकडे ते कधीही बोलत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींवर बिनबुडाचे आरोप करण्याचा आम्ही निषेध करतो," अशा शब्दांत शेलारांनी जरांगे यांचे फडणवीसांवरील आरोप फेटाळून लावले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAshish Shelarआशीष शेलारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील