शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 08:15 IST

प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे.

मुंबई - Bacchu Kadu on Manoj Jarange Patil ( Marathi News )  जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली ती आक्षेपार्ह आहे. त्याचे बिल्कुल समर्थन करणार नाही. जरांगे पाटलांनी आरक्षणाव्यतिरिक्त राजकीय भाष्य करू नये. समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. राजकीय वादात त्यांनी पडू नये हे समाजासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आरक्षणाबाबत काय असेल त्यावर बोलावे. मूळ गोष्टी सोडून बाहेरच्या विषयावर बोलू नये असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. 

आमदार बच्चू कडू म्हणाले की, आधी जरांगेंचं आंदोलन सरकारला जड होतं, आता सरकार जरांगेंवर भारी पडतंय हे दिसतं. एसआयटी चौकशी करायची तर ज्या अडीचशे लोकांच्या आत्महत्या झाल्या त्यावरही चौकशी करायला हवी. जरांगेंच्या मागील बोलविता धनी कोण, जाळपोळ, दगडफेक कुणी केली याचा शोध घेण्यास हरकत नाही पण ७५ वर्ष मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे हा समाज मागे पडला. आता सगेसोयरेबाबत लोकांचा संभ्रम निघाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली तशी प्रभू रामचंद्राची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच  कुणाला विरोधात उभं करण्याची गरज नसते. प्रत्येकाची वैयक्तिक मते असतात. ज्यांना जी गोष्ट पटते ते ते करत असतात. प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही. सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यावर प्रक्रिया सुरू आहे असं सांगत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. सरकार आपल्याविरोधात षडयंत्र रचतंय असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी विधानसभेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. जरांगेंचा बोलविता धनी कोण, दगडफेक कुणी करायला सांगितली, कोणत्या कारखान्यावर बैठक झाली यासारखे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर छत्रपतींचे नाव घेऊन आई बहिणीवर शिवीगाळ करणे योग्य आहे का? यामागचं षडयंत्र आता बाहेर येईल असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी परखड भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण