शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

“वर्षभर दौरे करणार नाही, मला दररोज धमक्या येतात, माझे कुटुंब आता...”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 20:30 IST

Manoj Jarange Patil News: चंद्र-सूर्य असेपर्यंत मराठा आरक्षण राहणार आहे. त्याची काळजी नको, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: कायम टिकेल असे काहीतरी मागा. लाडकी बहिणीला दिलेले पंधराशे रुपये पुरतात का? बाजारात जाईपर्यंत उडून जातात. हीच किंमत आपल्या लेकरा बाळांची केली आहे का? मी जातपात पाहत नाही, तसे असते तर महादेव मुंडेच्या कुटुंबासाठी मी लढलो नसतो. माझ्यामुळे दाबलेली केस उघडी झाली आणि आता आरोपींना जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

लाथ मारेन तिथून पाणी काढून दाखवेन. त्यामुळे शेतकऱ्यांना आता माझ्यासोबत हाक दिली की, एकत्र यावे. मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही. कसे हमीभाव मिळत नाहीत. कशी पिक विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाहीत. फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईन. आपल्यावर सातत्याने काही दुकानदार माध्यमातून गबाळ उचलण्याची टीका करतात. मात्र या सर्व गाड्या समाजाच्या आहेत. मला जर यांनी गाडीतून खाली उतरवले तर माझ्याकडे रिक्षालाही पैसे नाहीत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. एका सभेत ते बोलत होते. 

आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा

वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार आहोत. समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास पंधरा मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. वर्षभर हेच काम पूर्ण करणार आहे. त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा. मला माझे काम करू द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

दरम्यान, चंद्र-सूर्य असेपर्यंत मराठा आरक्षण राहणार आहे. त्याची काळजी नको. समाजासाठी लढतो म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत आहेत. माझे कुटुंबही यात डावावर लागले आहे. कधी कोणी येऊन मला मारून टाकेल, याची कल्पनाही नाही. पण मी समाजासाठी उतरलो आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि मी मरणाला भीत नाही, असे जरांग यांनी म्हटले आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Threats force Manoj Jarange Patil to halt year-long tours.

Web Summary : Manoj Jarange Patil halts tours due to threats, focusing on a new support system for the Maratha community. He vows to continue fighting for farmers' rights and Maratha reservation, undeterred by daily death threats against him and his family.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण