शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:35 IST

आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय असा सवाल जरांगेंनी विचारला. 

जालना - २६ जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून १ वर्ष पूर्ण होतंय, परंतु याची अंमलबजावणी करायला वर्षभर का लागला. गोरगरीब लेकरांचे प्रश्न का मार्गी लावला जात नाही. आमच्या लेकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही टाहो फोडतोय. गरीब मराठ्यांना किती राबावे लागते, आमची पोरं डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजे. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे संस्थानचं मूळ गॅझेट लागू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं सांगत आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतूनच द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेतली. त्यात मराठा आरक्षण आणि संतोष देशमुख प्रकरणावरून त्यांनी सरकारला इशारा दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने दिलेले आरक्षण टिकणारं नाही. ते आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते. ५० टक्क्यावरचं आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण मागतोय. १८८४ पासून आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. घर आमच्यावर नावावर आहे तुम्ही घुसलोय. एक दोन ओबीसींमध्ये अतातायीपणा आहे. SEBC आरक्षण तुम्ही दिले, विद्यार्थ्यांचे पहिले सत्र झाले, आम्ही हे आरक्षण मागितले नसताना ते सरकारने दिले. SEBC च्या अंतर्गत पोरांनी प्रवेश घेतले. आता त्या लाखो पोरांना शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप मिळत नाही. आता कॉलेज १०० टक्के फीस मागायला लागलेत असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले, कालच माझ्याकडे एक अर्ज आला. पुण्यातील वाघोलीतल्या कॉलेजनं एका मुलीला पत्र लिहून अद्याप मुलींना मोफत शिक्षणाची अंमलबजावणी झाली नाही असं कळवले. कोल्हापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्षानेही पत्र देऊन मुलीचा प्रवेश रद्द करू नये असं कॉलेजकडे मागणी केली आहे. हा इतका बोगस प्रकार आहे. आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय, आमच्या हक्काचं आरक्षण दिले जात नाही असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला.

दरम्यान, बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय म्हणून मराठे शांत बसले आहेत. आमच्याशी दगाफटका व्हायला लागलाय आणि सरकारमधील एक मंत्री सांभाळण्यासाठी खून पचवायचा आहे आणि आरोपी सुटले तर आम्ही रस्त्यावर येऊ. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कुठलीही काटकसर करायची नाही. देशमुख कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही असं वाटतं. या धनंजय मुंडेंच्या टोळ्या आहेत त्यांना सांभाळण्याची गरज काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांना विचारला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण