Manoj Jarange Patil News: चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो. त्यांना म्हणावे की, मागच्या पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या. ओपन मधल्या सगळ्या जागा सोडा. आम्ही तुमच्याबद्दल कधी वाईट बोललो नाही. तुमची एवढी वाईट नियत? तुम्ही किती विरोध करा, महाराष्ट्रातील मराठ्यांना मी आरक्षण देणारच, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, परळीच्या लाभार्थी टोळीला बोलता येत नसल्याने त्यांनी आता इतरांना हाताला धरुन मराठ्यांविरोधात उभे केलंय. ज्यांच्या आरक्षणाला काहीच धक्का लागणार नाही अशा गरीब धनगर आणि वंजारी समाजाला मराठ्यांच्या विरोधात भडकवले जात आहे, असा आरोप करताना, परळीत पाळला एक. त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व वंजारी, ओबीसी बदनाम केले. त्याचा एक डोळा चष्म्यातून बाहेर येत आहे, गरीबांचे वाटोळं करण्याची बेक्कार फेड असते, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.
अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही
अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचं असून दिलं नाही तो अन्याय वेगळाच. कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला? त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व वंजारी, ओबीसी बदनाम केले. त्या गँगला आता बोलता येईना म्हणून दुसरे नेते बोलावून घेतले आणि इकडे जातीवाद पेटवून दिला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. सरकार म्हणून कुणाला नाराज करणार नाही, कुणावरही अन्याय करणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
दरम्यान, मराठ्यांच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली. या टोळीच्या माध्यमातून धनगर हाताशी धरायचे. गरीब धनगरांना आणि बीडच्या धनगर, मराठ्यांना माहित आहे की लाभार्थी टोळी फक्त यांचा वापर करते. तुमच्या आई-बहीणीला आम्ही कधी बोललो का? तुमची लेक आमची लेक समजली. पण आता त्याची पायली भरली आहे. लेकीबाळांवर बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशी विचारणा करत मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.