शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

५८ लाख नोंदींचा आकडा लपवला जातोय? विखे पाटलांच्या 'त्या' विधानावर मनोज जरांगेंचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:52 IST

मृतांच्या नातेवाईकांना नोकरीसाठी 'ठरावाचे नाटक' कशाला? जरांगे पाटील आक्रमक

वडीगोद्री (जि. जालना): "मराठवाड्यातील मराठा समाज एक वर्षाच्या आत कुणबी प्रमाणपत्राशिवाय राहणार नाही. प्रत्येक घरात हे प्रमाणपत्र पोहोचेल," असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या नोंदी, प्रलंबित गुन्हे आणि मृतांच्या नातेवाईकांना नोकरी या विषयांवर सरकारला खडे बोल सुनावले.

नोंदींच्या आकड्यावरून संभ्रमशिंदे समितीने ५८ लाख नोंदी शोधल्याचे प्रोसिडिंग आम्हाला दिले होते, मग आता ४८ लाखांचा आकडा कुठून आला? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खालचे अधिकारी दिशाभूल करत असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.

गुन्हे मागे घेण्यावरून इशारामुंबई आंदोलनातील ८ पैकी ७ गुन्हे मागे घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले, पण एक गुन्हा का मागे ठेवला? असा प्रश्न विचारला. "ज्या मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले, त्यांच्यावरचे सर्व गुन्हे तातडीने मागे घ्या. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका, अन्यथा वाळवंटासारखे दिवस येतील," असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

मृतांच्या नातेवाईकांना नोकरी द्याआंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार एमआयडीसी किंवा महावितरणमध्ये नोकरी देण्याचा जीआर सरकारने काढावा. यासाठी 'ठराव' मागून घेण्याचे नवीन नाटक कशाला? असा सवाल करत त्यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या उपसमितीला धारेवर धरले.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Patil questions missing Maratha caste certificate records, warns government.

Web Summary : Manoj Jarange Patil demands clarity on Maratha record discrepancies and warns the government to address pending issues like job provisions for deceased relatives and withdrawing cases against protestors, or face consequences.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील